ऐसे दिस जाती...

» शुक्रवार, ११ जून, २०१०

काही प्रश्न आहेत:

नुकत्याच परिक्षा संपल्या... महिनाभरापासून नुसतं टेन्शन होतं परिक्षेचे... झाल्या एकदाच्या! असो... प्रत्येक वेळी नव-नविन अनुभव मिळताहेत, अनेकांकडून मोलाचे सल्ले मिळताहेत, त्यांचा मला पुढे नक्कीच फायदा होईल, यात शंका नाही... पण हाच मार्ग योग्य आहे का जगण्याचा, शिकण्याचा, अनुभव मिळवण्याचा, आणि दररोज दिवस (वाया) घालवण्याचा?

मला इंजिनिअरिंगला अजुन दोन वर्षे जायची आहेत, तोपर्यंत मला माझ्या फिल्डमधले आवश्यक तेवढे ज्ञान प्राप्त होईल खरे, पण ते तेवढेच असावे की मी माझ्या इच्छा-आकांक्षा अजून उंचावून इतरही अनेक गोष्टींवर लक्ष द्यायला हवे? तुम्हा लोकांचे जीवन दररोजचे रेग्युलर ऑफिस, नोकरी, घरकामे इत्यादी एवढ्यावरच थांबते का, की तुम्ही त्यात रंग भरण्यासाठी अजुन काही करता?

माझा ह्या लेखात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा सारांश एवढाच आहे, की हे जे दिवस जाताहेत, ते असेच जाऊ द्यावेत का?

सल्ले, अनुभव, आणि मला व माझ्यासारख्या इतरांना उपयोगी ठरतील अशा प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत...
Vishal Telangre